रावे ग्रामपंचायतीवर कमळ फुलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पेण

पेण तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी रावे ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले आहे. माजी कॅबिनेट मंत्री रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यात आली. यावेळी 11 सदस्य बिनविरोध निवडून आले. तर सरपंच पदाकरीता मतदान होऊन भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार संध्या नाशिकेत पाटील विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी शेकापच्या रेखा जनार्दन पाटील यांचा 756 मतांनी पराभव केला आहे. भाजपच्या संध्या नाशिकेत पाटील यांना 1801 मते मिळाली तर शेकापच्या रेखा जनार्दन पाटील यांना 1045 मते मिळाली. तर 42 जणांना नोटाचा पर्याय निवडला. युवानेते वैकुंठ पाटील, आदीनाथ पाटील, सुभाष पाटील, रायगड जिल्हा कामगार संघटनेचे सरचिटणीस वासुदेव पाटील, हिरामण पाटील, गुलाबचंद पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पाटील यांचे अभिनंदन केले आहे.