पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्य़ांचा शिवसेनेत प्रवेश, भाजप नगरसेवक-जिल्हा उपाध्यक्षांनी बांधले शिवबंधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम महाराष्ट्रातील भाजप व रासपच्या अनेक पदाधिकाऱ्य़ांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्य़ांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला. राज्यातील ग्रामपंचायती निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठे खिंडार पडले आहे.

या पदाधिकाऱ्य़ांमध्ये भाजपचे नगरसेवक व सांगली-तासगावचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, सांगली जिल्हा भाजप उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे, तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती जयवंत माळी, भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रदीप माने, मिरजमधील भाजपच्या हिंदू एकताचे मिरज शहर अध्यक्ष विजय शिंदे, भाजप किसान मोर्चाचे सातारा प्रदेश उपाध्यक्ष विश्वासराव सावंत तसेच सोलापूर प्रदेश सचिव दादासाहेब येडे पाटील, सातारा जिल्हा उपाध्यक्ष भरत देसाई, अशोक काळुगडे, फलटण प्रदेश सदस्य कल्पना गिड्डे, रासपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा श्रद्धा भातंब्रेकर (पुणे) तसेच प्रदेश सचिव सुरेखा वाघ (नंदुरबार), प्रदेश सदस्य उज्ज्वला पटेल, प्रदेश सचिव आशावरी पुरोहित (पुणे), प्रदेश सचिव भाग्यश्री तिळवणकर (सातारा) यांचा समावेश आहे. यावेळी शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई, सांगली व सातारा जिल्हा संपर्पप्रमुख व उपनेते नितीन बानुगडे-पाटील, समन्वयक दगडू सकपाळ, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व संजय विभुते उपस्थित होते.