
तीळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. महत्त्वाचं म्हणजे तीळ हा आपल्या किचनमधील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. मुख्यत: तीळाचे दोन प्रकर असतात. काळे तीळ आणि पांढरे तीळ. या तिळाचा वापर लाडू, चिक्की यांसारख्या गोड पदार्थांमध्ये केला जातो. तसेच भाजी किंवा आमटीमध्येही चवीसाठी तीळाचा वापर होतो. मात्र तीळाचे सेवन फार कमी लोक करतात. कोणते तीळ आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असतात? या दोन्ही तीळांपैकी कोणते तीळ आपल्याला फायदेशीर ठरू शकते? याबाबत आपण जाणून घेऊया…
सामान्यत: दोन्ही प्रकारच्या तीळाचा जेवणात वापर केला जातो. मात्र, काळ्या तीळामध्ये पांढऱ्या तिळापेक्षा जास्त फायदे असतात. काळ्या तीळात फायबर, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-३, कॅल्शियम आणि अशी अनेक महत्त्वाची जीवनसत्त्वे असतात. काळ्या तीळाचे सेवन केल्याने तुम्ही अनेक रोगांपासून दूर राहू शकता. साधारपणे काळ्या तीळाच्या वरची साल काढली जात नाही. पांढरे तीळ मात्र साल काढलेले असतात. काळ्या आणि पांढऱ्या तीळाची चवही वेगवेगळी असते.
पांढरे तीळ-
1. पांढरे तीळ हे चवीला थोडेसे मऊ, गोडसर असतात
2. पांढरे तीळ लाडू किंवा पेढ्यांमध्ये टाकून खाऊ शकतो. सामान्यत: गोड पदार्थांमध्ये हे तीळ वापरले जातात.
3. पांढऱ्या तीळांचा वापर राठ्याच्या पीठात किंवा रोटीतही केला जातो.
4. सॅलड किंवा सूपमध्ये पांढरे तीळ टाकल्यामुळे त्याचा स्वाद आणखीच वाढतो.

काळे तीळ
1. काळे तीळ हे चवीला थोडे जास्त कडू आणि खमंग असतात.
2. काळे तीळ दूध किंवा लस्सीमध्ये घालून प्यायल्याने त्याचा आरोग्याला उत्तम फायदा होतो.
3. काळ्या तिळाचे तेल आणि तिळाचे लाडू देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
4. चिक्की आणि तिळ लाडू यांसारख्या पदार्थांमध्येही काळ्या तिळाचा वापर केला जातो.
काळ्या तीळामध्ये पांढऱ्या तिळापेक्षा थोडे जास्त ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. त्यामुळे हृदयासह इतर अनेक अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी ते फायदेशीर ठरते. या काळ्या बिया अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण करतात. काळे तीळ हे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात. ज्यामुळे शरीर सहजपणे रोगांशी लढू शकते.
मधुमेह असेल तर काळ्या तीळाचे सेवन फायदेशीर ठरते. काळ्या तीळमध्ये फायबर असते जे साखरेचे शोषण कमी करते. तसेच सांधे दुखत असतील तर अशा लोकांनी काळ्या तिळाचे सेवन केले पाहिजे. काळे आणि पांढरे तीळ भाजून खाणे अधिक फायदेशीर असते.


























































