राधानगरी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रात स्फोट, वीज निर्मिती ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, कोल्हापूर

राधानगरी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रामध्ये स्फोट झाला आहे. धरणाचे अतिरिक्त आपत्कालीन दरवाजे (emergency gate) उघडण्यात आले होते. यामुळे पात्रात पाणी पडताच ते उफाळून वीज निर्मिती केंद्रात घुसले. हे पाणी घुसल्याने वीज निर्मिती केंद्रात मोठा स्फोट झाला. यामुळे वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे.

धरणातील वीज निर्मिती केंद्रात महापारेषणच्या ११० केव्ही विजेची निर्मिती होते. स्फोटामुळे महापारेषणकडून महावितरणच्या राधानगरी, सोळांकूर व कसबा तारळे ३३/११ केव्ही उपकेंद्रांना मिळणारा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या केंद्रातील वीज पुरवठा दुसऱ्या मार्गाने सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.