
पावसाळा तोंडावर असताना विक्रोळीच्या कन्नमवार नगरातील वर्कशॉपमध्ये लगबग वाढली आहे. तिथे रंगीबेरंगी, आकर्षक आणि मागणीनुसार छत्र्या बनवण्याचे काम सुरू आहे. या छत्र्यांचे वेगळेपण म्हणजे त्या ‘डोळस’ हातांनी बनवलेल्या आहेत. होय, या छत्र्या बनवणाऱया महिला नेत्रहीन आहेत. ‘द नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड एंटरप्राईज’ या संस्थेच्या माध्यमातून छत्र्या बनवून नेत्रहीन महिलांना रोजगार मिळत आहे. लॉकडाऊनमध्येही या महिलांचे काम थांबलेले नाही. सलाम त्यांच्या जिद्दीला!
1987 साली विक्रोळीत नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड एंटरप्राईज या नेत्रहीन, दिव्यांगांसाठी काम करणाऱया संस्थेची स्थापना झाली. या संस्थेमार्फत नेत्रहीन, दिव्यांगांना प्रशिक्षण दिले जाते. तिथे कागदी आणि कापडी पिशव्या तयार करणे तसेच स्टेशनरी, स्क्रीन प्रिंटिंग ही कामे केली जातात. छत्री बनवणे हा तर संस्थेचा सर्वात जास्त लोकप्रिय उपक्रम आहे. एपूण 35 जण छत्र्या तयार करतात. त्यात 25 नेत्रहीन महिला आहेत. छत्र्यांच्या तारांची जुळणी करून त्यावर कपडा लावण्यापर्यंतची कामे या महिला करतात. तेही अगदी सहजतेने! त्यांची चपळाई बघून थक्क व्हायला होतं. या महिला मुंबई, ठाणे येथील विविध ठिकाणांहून येतात. बस, ट्रेनने लांबचा प्रवास करतात. ‘नेत्रा’ असे नेत्रहीन महिलांनी बनवलेल्या छत्र्यांचे नाव आहे. मार्पेटचा ट्रेंड बघून किंवा कॉर्पेरेट पंपन्यांच्या मागणीनुसार काम घेतले जाते.
सध्या कोरोनाच्या काळात अंध-दिव्यांगांच्या सुरक्षेची सर्व खबरदारी घेतली जात आहे. सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून काम सुरू आहे.
– गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये नेत्रहीन-दिव्यांगांना ट्रेनने प्रवास करता आला नाही. त्यामुळे जे जवळ राहत होते तेच लोक बसने कामावर आले. त्यामुळे छत्र्या, स्टेशनरी, कापडी-कागदी पिशव्या यांचे उत्पादन कमी झाले. संस्थेची साधारणपणे महिन्याला 25 हजार तर वर्षाला तीन लाख छत्र्या बनवण्याची क्षमता आहे. मात्र या वर्षी अपुऱया मनुष्यबळामुळे सुमारे 35 हजार छत्र्या बनवल्या आहेत.
सध्या संस्थेची विक्रोळीत कन्नमवार नगर, टागोर नगर येथे वर्पशॉप आहेत. वर्पशॉपसाठी लागणारी दोन गाळ्यांची जागा भाडय़ाने घेतली आहे. भाडय़ापोटी मोठी रक्कम द्यावी लागते. संस्थेच्या कामासाठी जागा मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना रोजगार देणे शक्य होईल.
– के.एन. राधापृष्णन नायर, संस्थापक, नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड एंटरप्राईज






























































