नायर रुग्णालय दंत महाविद्यालयात रक्तदान

जागतिक रक्तदान दिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या मुंबई सेंट्रलमधील नायर रुग्णालय दंत महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 71 जणांनी रक्तदान केले. बा. य. ल. नायर धर्मार्थ रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या वतीने आज शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी करत रक्तदानही केले. यावेळी वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांच्या संचालक आणि नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे, पॅथॉलॉजी विभागाच्या प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी बालसुब्रमण्यम्, सहयोगी प्राध्यापक डॉ. स्विटी शिंदे यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.