स्थायी समितीमध्ये गळती दुरुस्तीच्या कामांना मंजुरी, कोरोनामुळे ‘बुडालेले’ कंत्राटदार कमी दराने काम करताहेत

गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत शिरकाव केलेल्या कोरोनाने सर्वसामान्य नागरिकांबरोबरच उद्योगधंदे, व्यावसायिक, बिल्डरांसह कंत्राटदारांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे हे कंत्राटदार पालिकेची कामे निर्धारित रकमेच्या तब्बल 29 ते 40 टक्क्यांपर्यंत कमी दराने करण्यास तयार झाले आहेत. याबाबत आज जलवाहिन्यांची दुरुस्ती-देखभालीच्या चार प्रस्तावांना स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली.

जलवाहिन्यांची गळती व अचानक कराव्या लागणाऱया दुरुस्तीच्या संभाव्य कामांसाठी कंत्राट देण्याचे प्रस्ताव आज प्रशासनाकडून स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आले. यामध्ये मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील कामांसाठी एकूण चार प्रस्ताव मांडण्यात आले. यामध्ये कंत्राटदारांनी थेट 29 टक्के ते 40 टक्क्यांपर्यंत कमी दराने करण्याची तयारी दाखवण्यात आली. मात्र कंत्राटदार इतक्या कमी दराने काम करणार असेल तर कामाचा दर्जा कसा राखणार, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला.

अशी कामे होणार

शहर, पूर्व व पश्चिम उपनगरातील 300 मि.मी. क त्याकरील आकाराच्या जलवाहिन्यांची गळती, चेंबरची बांधकामे, जलवाहिन्यांची व नियंत्रण झडपांच्या कामाचे कंत्राटाचे प्रस्ताव स्थायी समितीत मांडण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या