महापालिकेच्या डायरीत स्वच्छ-सुंदर मुंबई दर्शन आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेने या वर्षी तयार केलेल्या ‘डायरी 2023’मध्ये हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुशोभित झालेल्या ‘स्वच्छ-सुंदर’ मुंबईचे दर्शन घडणार आहे. या दिनदर्शिकचे प्रकाशन आज पालिका आयुक्त -प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते करण्यात आले. महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्याकडून 1958 पासून ही ‘नागरी दैनंदिनी’ प्रकाशित करण्यात येत आहे.

महानगरपालिकेची ही नागरी दैनंदिनी पालिकेशी संबंधित विविधांगी माहितीने परिपूर्ण, आकर्षक आणि उपयुक्त आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट रोजी पालिका क्षेत्रातील ऐतिहासिक इमारती व विविध ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. या सुशोभित आकर्षक छायाचित्रांनी यंदाच्या दिनदर्शिकेचे प्रत्येक पान सजले आहे. या डायरीच्या प्रकाशनप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशीष शर्मा, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त संजोग कबरे, सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे, पालिका मुद्रणालय व्यवस्थापक सुधीर तळेकर आदी उपस्थित होते. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबईकर नागरिकांना देण्यात येणाऱया सोयीसुविधांची तपशीलवार माहिती आणि पदाधिकारी व अधिकाऱयांचे संपर्क क्रमांक यात दिले आहेत.