हृदयविकाराच्या झटक्याने पालिका कर्मचाऱयाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

पालिका मुख्यालयात काम करणाऱया लिपिकाला अस्वस्थ वाटू लागले. मात्र, कोरोनाच्या भीतीने त्याच्या मदतीला कोणी गेले नाही. काही वेळाने त्याला नायरमध्ये नेण्यात आले. मात्र, तिथे नेण्याआधीच हृदयविकाराच्या झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली.

पालिका मुख्यालयात काल ही घटना घडली. अजित दुखंडे (52) हे कर्मचारी पालिका विरोधी पक्षनेते रविराजा यांच्या कार्यालयात काम करत होते. त्यांना अवस्थ वाटू लागले. मात्र, त्यांना कोरोना झाला असेल या भीतीने त्यांच्या मदतीला कोणी आले नाही. तसेच त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याऐवजी नायरमध्ये नेण्यात आले. तोपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या कर्मचाऱयाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने हा केवळ कोरोनाच्या भीतीमुळे आणि निष्काळजीपणामुळे गेलेला बळी आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते रविराजा यांनी केला. पालिका कर्मचाऱयांसाठी जवळील रुग्णालयात उपचारांची सुविधा मिळावी, अशी मागणीही रविराजा यांनी केली.