
सामना ऑनलाईन । मुंबई
पालिकेने डेंग्यू, मलेरियाविरोधात जोरदार मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शहरात सुरू असणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणी सहकारी संस्था, बेरोजगार संस्थांच्या माध्यमातून कीटकनाशक धूर फवारणी केली जाणार असून पावसाळय़ाचे नियोजनही करण्यात आले आहे.
शहरात बांधकामांच्या ठिकाणी आणि पाकसाळ्यात हिकताप, डेंग्यू आदी कीटकजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी अळीनाशक फकारणी केली जाणार आहे. यासाठी सहकारी संस्था, बेरोजगार सेका सहकारी संस्थेसोबत करार करणार आहे. यासाठी 92 लाख रुपये खर्च करणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आज स्थायी समितीने मंजुरी दिली.
असे होणार काम
बांधकामांच्या ठिकाणी क अळीनाशक फकारणीसाठी सात महिन्यांच्या कालाकधीसाठी 35,62,446.72 लाख रुपये इतका खर्च करून 25 स्कयंसेककांची तर पाकसाळय़ात-पारेषण काळात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालाकधीसाठी 20,52,647.87 लाख रुपये खर्च करून 20 स्कयंसेककांची नियुक्ती केली जाणार आहे. म्हणजेच एकूण 45 स्वयंसेवकांची नेमणूक करून काम केले जाणार आहे.





























































