महापालिकेची घरांसाठी सोडत, 373 जणांचे गृहस्वप्न साकार

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 अंतर्गत प्राप्त 426 घरांची संगणकीय सोडत शनिवारी ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली. या सोडतीत 426 घरांपैकी 373 अर्जदारांना घरे मिळाली. 362 अर्जदार प्रतीक्षा यादीवर आहेत.

सदनिका विजेत्या यशस्वी अर्जदारांना ई-मेलद्वारे माहिती कळविण्यात येणार आहे. तसेच कागदपत्र पडताळणीसाठी पुढील प्रक्रियेसाठी संपर्क साधण्यात येईल. सोडत प्रक्रियेतील यशस्वी तसेच प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची माहिती ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पालिका मुख्यालयाच्या विस्तारित इमारतीतील माहिती फलकावर ही यादी सोमवारी पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाजार विभागामार्फत पालिका मंडईमध्ये पाच टक्के दिव्यांग आरक्षणांतर्गत दिव्यांग नागरिकांना व्यवसाय करण्याकरिता अनुज्ञापत्र व गाळे / स्टॉल/ जागा इत्यादींची ऑनलाईन पद्धतीद्वारे सोडतदेखील पार पडली. या सोडतीदरम्यान एकूण 43 यशस्वी दिव्यांग लाभार्थी अर्जदारांची घोषणा करण्यात आली. महापालिकेतर्फे आणखी 296 सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.