गणेशाच्या आगमनासाठी महापालिका सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

गणेशोत्सवाच्या आगमनासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी या सर्व व्यवस्थेची पाहणी केली. महापालिकेने चौपाटय़ांसह गणेश विसर्जनस्थळांवर सर्व सुविधांनी युक्त अशी व्यवस्था केली असून या सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत व गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून महापौरांनी आज पाहणी केली. प्रतिवर्षाप्रमाणे श्री गणेशोत्सव हा भव्य-दिव्य स्वरूपात तसेच सुनियोजितरीत्या साजरा व्हावा यासाठी महापालिका प्रशासन कार्य करीत असते. गणेशोत्सव बघण्यासाठी देशविदेशातील पाहुणे गिरगाव चौपाटी येथे येत असून त्यांच्यासाठी गतवर्षीप्रमाणे सर्व सुविधांनी युक्त सुसज्ज मंडपाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे यावेळी महापौरांनी सांगितले. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेताना प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.