उघडे, तुटलेले, कव्हर गायब मॅनहोल दिसताच 9324500600 येथे तक्रार करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत मॅनहोल दुर्घटना टाळण्यासाठी कोणत्याही ठिकाणी उघडे, तुटलेले, कव्हर गायब असलेले मॅनहोल आणि उघडय़ा धोकादायक गटाराचे ठिकाण आढळल्यास तातडीने तक्रार नोंदवा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासाठी पालिकेने स्वतंत्र व्हॉट्सअॅप चॅटबॉट क्रमांक 9324500600 सुरू केला आहे.

नागरिकांनी तक्रार सबमिट करा हा पर्याय निवडून घटनास्थळाचे लोकेशन शेअर करावे आणि समस्येचे छायाचित्र अपलोड करावे. तक्रार नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकाला पुढील पाठपुराव्यासाठी तक्रार नोंदणी क्रमांक प्राप्त होईल. याशिवाय नागरिकांनी प्रथम ‘माय बीएमसी मार्ग’ अॅप उघडून मोबाईल क्रमांक आणि ओटीपीच्या साहाय्याने लॉग-इन करावे. त्यानंतर ‘नवीन नोंदणी’ हा पर्याय निवडून तक्रारीचा प्रकार निवडावा. आवश्यक असल्यास समस्येचे थोडक्यात वर्णन नमूद करावे. संबंधित ठिकाणाचे विद्यमान छायाचित्र अपलोड करावे किंवा जिओ-टॅग केलेले छायाचित्र काढून अपलोड करावे. त्यानंतर तक्रार सादर केल्यानंतर नागरिकाला पुढील पाठपुराव्यासाठी तक्रार नोंदणी क्रमांक प्राप्त होतो. शिवाय पालिकेच्या व्हॉट्सअॅप चॅटबॉट क्रमांक 8999228999, अधिकृत संकेतस्थळ आणि 1916 हेल्पलाईनद्वारेही तक्रारी नोंदविता येतात. पालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करण्याची सुविधा आहे.