
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात शैक्षणिक दुवा कायम ठेवला आहे. तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी चार भाषांमध्ये 40 यूट्युब चॅनेल सुरू केली असून आतापर्यंत 21 हजार पालिका शिक्षकांनाही ऑनलाईन प्रशिक्षण दिले आहे.
कोरोनाच्या काळात पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी युनिसेफसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांसह संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचेही बहुमोल सहकार्य पालिकेच्या शिक्षण खात्याला लाभले असल्याची माहिती सहआयुक्त (शिक्षण) आशुतोष सलील यांनी दिली आहे.
बालकमित्र व पालकमित्र
बालकमित्र आणि पालकमित्र उपक्रमात पालकांनी एकत्र येऊन एकाच शाळेत किंवा एकाच इयत्तेत असणार्याल पाल्यांचे म्हणजेच विद्यार्थ्यांचे गट तयार करून एकाच इयत्तेत असणार्याज विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक तो समन्वय साधून शिक्षण दिले जाते. यानुसार ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे.
व्यवसाय पत्रिका
ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक अॅ्न्ड्राईड मोबाईल, इंटरनेट इत्यादी नाही, त्याचबरोबर बालकमित्र–पालकमित्र यासारख्या उपक्रमात सहभागी होण्याचा पर्यायदेखील उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ‘व्यवसाय पत्रिका’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासक्रमांनुसार ‘व्यवसाय पत्रिका’ तयार करून ती विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेचे शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी दिली आहे.




























































