आंबेनळी घाटात पुन्हा अपघात, बीएमडब्ल्यु कार 50 फूट खोल दरीत कोसळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सातारा

काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर – पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटातून बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघात 30 जणांचा मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी शनिवारी सकाळी एक बीएमडब्ल्यु कार 50 फूट खोल दरीत कोसळली आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली आहे. या अपघातात गाडीचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवारी सकाळी कार चालक प्रशांत सस्ते (राहणार भोसरी, पुणे) हे पोलादपूरहून महाबळेश्वरला निघाले होते. आंबेनळी घाटातील बावली टोक येथे गाडी आली असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट 50 फूट खोल दरीत कोसळली. दरम्यान ससाटे यांनी प्रसंगावधान राखून गाडीतून बाहेर उडी मारली असता ते एका झाडावर अडकले. यावेळी पाठीमागून येणाऱ्या एका गाडी चालकाने अपघाताची माहिती प्रतापगड येथील वाडा कुंभरोशीच्या ग्रामस्थांना दिली. अपघाताची माहिती कळताच गावातील घटनास्थळी धाव घेत चालकाला बाहेर काढले.