निसर्गमित्रांसाठी बीएनएचएसचे ऑनलाइन अभ्यासक्रम

bombay-natural-history-society

सामना प्रतिनिधी । मुंबई

अनेकांना निसर्गाबद्दल कुतूहल असतं. खूप काही जाणून घ्यायचं असतं, पण नोकरी भलत्याच क्षेत्रात मिळालेली असते. त्यामुळे निसर्गाशी जुळवून घेता येत नाही. इच्छा असूनही काहीतरी शिकायचं आहे. ही मनातली गोष्ट आपण दाबून टाकतो. अशा सर्व निसर्गप्रेमींसाठी मुंबईची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही संस्था वेगवेगळे पाच ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करत आहे. पक्षी, फुलपाखरे, वनस्पती, जैवविविधता, सरपटणारे प्राणी आदींबद्दल शिक्षण घेणे त्यामुळे सुलभ झाले आहे. दहावी पास झालेली कुणीही व्यक्ती या अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकते.

सर्व कार्यक्रम (जंगल भ्रमंती, क्लासरूम), विषय तज्ञांची व्याख्याने रविवारी असतात. कॅम्पस शुक्रवार ते रविवार असेच ठेवले जातात. सर्व माहिती ऑनलाइन पाठविली जाते. कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. काही कोर्सेस चार महिने, सहा महिने तर काही एक वर्ष कालावधीचे असून खेळीमेळीच्या वातावरणात सोप्या भाषेत सर्व विषय शिकविले जातात. बी.एन.एच.एस.च्या शास्त्रज्ञांकडून प्रत्यक्ष शिकायला मिळते. अधिक माहिती बी.एन.एच.एस.च्या संकेतस्थळावर तसेच फेसबुक ग्रुपवर मिळू शकते.

अधिक माहितीसाठी: cec-mumbai@bnhs.org या ईमेल आयडीवर तसेच 022-22821811 मोबाईल क्रमांक +919594953425. वर संपर्क करता येईल.