
तैवानमध्ये प्रथम उगम पावलेला बबल टी किंवा बोबा टी आता हिंदुस्ठानातील स्ट्रीट फूडमध्ये प्रवेश करत आहे. त्याच्या रंगीबेरंगी बबल आणि जिभेखाली येणारे टॅपिओका सर्वांनाच आवडत आहेत. परंतु बोबा टी पिल्याने लहान असो किंवा तरुणांमध्ये पचन आणि चयापचय यांसारखे आरोग्य परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच एका कप कोरड्या टॅपिओका मोत्यांमध्ये 544 कॅलरीज असतात.
बबल टीचे सर्वात प्रतिष्ठित वैशिष्ट्य म्हणजे टॅपिओका मोतींमुळे सर्वांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. कसावा वनस्पती नैसर्गिकरित्या मातीतून शिसे आणि कॅडमियम सारख्या जड धातू शोषून घेतात. बोबा टी पिल्यामुळे मळमळ, वेदना आणि क्वचित प्रसंगी पचनसंस्थेत अडथळा देखील येतो. काही बबल टीमध्ये जोडले जाणारे जाडसर ग्वार गम वारंवार सेवन केल्यास शरीरात बद्धकोष्ठता वाढू शकते. विशेषतः लहान मुलांमध्ये हे टॅपिओका मोती गिळल्याने गुदमरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
बबल टी पिल्याने या समस्या होण्याची शक्यता
शरीरात साखर आणि चयापचयचे प्रमाण वाढणे
बबल टीमध्ये आणखी एक मोठी समस्या म्हणजे टॅपिओका बबल टी मध्ये २०-५० ग्रॅम साखर असते, जी आरोग्यासाठी हानीकारक असते . जे लोक दररोज किंवा आठवड्यातून अनेक वेळा बबल टीचा आनंद घेतात त्यांच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढम्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.
दातांची समस्या
जास्त साखरेचे सेवन केल्याने दात किडण्यासारख्या समस्या होऊ शकतात. जी मुले नियमितपणे बबल टी पितात त्यांना नऊ वर्षांच्या वयापर्यंत पोकळी निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तसेच तरुणांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरणारा एक घटक म्हणून बबल टी. कालांतराने, जास्त साखरेचे सेवन टाइप २ मधुमेह आणि फॅटी लिव्हर रोगाचा धोका देखील वाढवते, जे वारंवार रक्तातील ग्लुकोजच्या वाढीमुळे आणि यकृतामध्ये चरबी साठवण्यामुळे होतात.
किडनी स्टोन आणि मानसिक आरोग्य समस्या
बबल टीमधील काही घटक, ज्यामध्ये ऑक्सलेट आणि फॉस्फेटचे प्रमाण जास्त प्रमाणात असते त्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोोका वाढतो. मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये, वारंवार सेवन केल्याने चिंता आणि नैराश्य तसेच थकवा जाणवतो.























































