
लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांमुळे राज्याचे 32 कोटींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती आज महायुती सरकारने विधानसभेत दिली आहे. याबाबत सरकारने लेखी स्वरुपात माहिती दिली आहे. या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतून 26 लाख महिला अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच 14 हजार 297 पुरुषांनी या योजनेचा गैरलाभ घेतल्याचे सरकारने म्हटले आहे. यात साडेनऊ हजार शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांनी राज्य शासनाची फसवणूक केली आहे, असं सरकारने म्हटलं आहे. या योजनेचा गैरलाभ घेणाऱ्यांवर सरकार कारवाई करणार आहे. योजनेचा चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेल्या शासकीय कर्मचारी आणि पुरुषांकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे, अशी माहितीही राज्य सरकारने दिली.




























































