बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीचे प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी

बॉलिवूडमधील एका अभिनेत्याच्या मुलीचे प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी एका माथेफिरूने दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अचक केली आहे. कुमानी हानिफ पटानी असे त्या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मालाड येथे राहतो.

कुमानीने अभिनेत्याच्या मुलीकडे पैशाची मागणी केली होती व पैसे दिले नाही तर तिचे प्रायव्हेट फोटोस व्हायरल केले आहेत. कुमानीची बहिण ही अभिनेत्याच्या मुलीसोबत एकाच कॉलेजमध्ये शिकायची. पीडितेला त्याने इंस्टाग्रामवर मेसेज करून तिचे मॉर्फ केलेले फोटो पाठवले. त्यानंतर त्याने तिला फोन करून तिच्याकडे पैशांची मागणी केली. घाबरलेली पीडित तरुणी २० हजार रुपये द्यायला तयारही झाली. मात्र त्याने तिच्याकडे जास्त पैसे मागितले. त्यामुळे तिने हा सर्व प्रकार घरी सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्या नराधमाच्या मुसक्य़ा आळवल्या

आपली प्रतिक्रिया द्या