
बॉलीवूडच्या गाण्यांची व्रेझ अगदी विदेशातही दिसून येते. याचा प्रत्यय अनेकदा येत असतो. आताही एका स्वीडिश डान्सरने पत्नीसोबत ‘चुनरी चुनरी’ या हिंदी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. त्यांच्या व्हिडीयोने सोशल मीडियावर धुमापूळ घातला आहे. हे सलमान खान आणि सुष्मिता सेनच्या चित्रपटातील ‘चुनरी चुनरी’ गाणे आहे. विदेशी जोडीने गाण्यातील हुक-स्टेप्स ज्या सफाईदारपणे केल्या आहेत, ते पाहून नेटीजन्स थक्क झाले आहेत. त्यांच्या हातातील लाल रंगाची चुनरी तर कमाल आहे. व्हिडीयोतील डान्सर फक्त डान्सच करत नाही, तर तो उत्तम लिप-सिंक आणि ड्रमॅटिक एक्सप्रेशन्स देतानाही दिसतोय.




























































