पेण-आपटा बसमध्ये सापडलेली ती संशयास्पद वस्तू ‘बॉम्बच’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पनवेल

पेण-आपटा या बसमध्ये बॉम्ब सापडल्याने रायगडात खळबळ उडाली आहे. या बसमध्ये संशयास्पद वस्तू दिसल्याने बसच्या वाहनाने तत्काळ पोलिसांना कळवलं होतं. बुधवारी रात्री ही घटना वाहकाने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनीही वेळ वाया न घालावता स्फोटक नाशक विभागाला बोलावले. त्यांनी केलेल्या तपासणीमध्ये संशयास्पद वस्तू ही बॉम्बच असल्याचं कळालं.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात आणि घातपात घडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रायगडच्या पेण ते आपटा येथे जाणाऱ्या एका एसटीबसमध्ये बॉम्ब आढळल्याने घबराट पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार या बॉम्बसाठी युरिया आणि आईडीचा वापर केल्याचं सांगण्यात येत आहे.