
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात बॉण्डी समुद्र किनाऱ्यावर ज्यू समुदाय हनुक्का हा सण साजरा करत होते. यावेळी अचानक या नागरिकांवर दहशतवादी हल्ला झाला. दोन दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी एका व्यक्तीने झडप घातली आणि दहशतवाद्याच्या हातातून रायफल हिसकावून घेतली. या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जगभरातून त्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
समोर मृत्युचे तांडव सुरू असताना जीवावर उदार होऊन दहशतवाद्याला भिडणारा या व्यक्तीचे नाव अहमद अल अहमद असे आहे. अहमद अल अहमद आणि त्याचा जॉजे अल्कांज हे दोघे हनुक्का सण पाहण्यासाठी तेथे आले होते. यापूर्वी अहमदने सीरियामधील युद्ध पाहिले होते. त्यामुळे तो आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी 10 वर्षांपूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये आला होता.
#bondibeachattack – बॉण्डी समुद्र किनाऱ्यावर दहशतवादी बेछूट गोळीबार करत असताना अहमद अल अहमद नावाच्या व्यक्तीने कारच्या मागे लपून संधी साधत जिवावर उदार होत दहशतवाद्यावर झडप घातली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. pic.twitter.com/w1w4v4ewTT
— Saamana Online (@SaamanaOnline) December 15, 2025
अहमद अल अहमदचे सिडनीमध्ये फळांचे दुकान आहे. रविवारी अहमदचे दुकान बंद होते. तो आणि त्याचा चुलत भाऊ जोस अल्कांझ बोण्डी बीचवर फिरायला गेले होते. यावेळी ते फिरत फिरत कारच्या मागच्या दिशेने जात असताना अचानक गोळ्यांचा आवज आला आणि त्या समुद्र किनाऱ्यावर अंदाधुद गोळीबार सुरू झाला. हल्ला करणारे जोस अल्कांझ आणि अहमदपासून काहीच अंतरावर होते. त्यामुळे दोघेही घाबरले होते..
दरम्यान, या गोळीबारात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. हे थरारक दृश्य अहमदला सहन झाले नाही. त्यामुळे त्याने निडरपणे हल्लेखोरांचा सामना करण्याचा निर्णय घेतला. मी मरायला जातोय. प्लीज माझ्या कुटुंबावर लक्ष ठेव. त्यांना सांग की मी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जात आहे, असे म्हणत अहमद अल अहमदने संधी साधत जिवावर उदार होत दहशतवाद्यावर झडप घातली आणि दहशतवाद्याच्या हातातून रायफल हिसकावून घेतली. अहमदला रायफल चालवता येत नव्हती. त्यामुळे त्यामुळे त्याने दहशतवाद्याकडे ती रोखून धरली. मात्र, त्याच वेळी दुसऱ्या दहशतवाद्याने त्यांच्यावर पाठीमागून गोळी मारली. त्यात अहमद जखमी झाला. अहमदला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आहे.
दरम्यान, अहमदसाठी ऑस्ट्रेलियामध्ये क्राउडफंडिंग सुरू आहे. 3 लाख डॉलर्स आधीच जमा झाले आहेत. हे क्राउडफंडिंग कार हब ऑस्ट्रेलियाद्वारे आयोजित केले जात आहे. यामध्ये अमेरिकेचे अब्जाधीश बिल अॅकमन यांचा समावेश आहे. त्यांनी एक लाख डॉलर दिले आहे. तर कार हबने 50 हजार डॉलर दिले आहे.
सिडनी बीच हल्ल्यामागे पाकिस्तान कनेक्शन, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांची माहिती




























































