
ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर 14 डिसेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी न्यायालयात कागदपत्रे सादर झाली. त्यानुसार, या हल्ल्यातील आरोपी पिता-पुत्राने एका गावातील गुप्त ठिकाणी बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. 50 वर्षीय साजिद अक्रम आणि त्यांचा 24 वर्षीय मुलगा नवीद अक्रम यांचा एक व्हिडीओ सापडला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही विशेष प्रशिक्षण घेताना दिसतात.


























































