बीएनएचएस दुर्मिळ पुस्तकांचा खजिना उघडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानात व्यापार करण्यासाठी आलेल्या ईस्ट इंडीया कंपनीने नंतर हिंदुस्थानवर दीडशे वर्ष राज्य केले. इंग्रजांनी हिंदुस्थानवासीयांवर अनन्वीत अत्याचार केले असले तरीही त्यांच्या येण्याने अनेक सुधारणाही झाल्या होत्या. निसर्गाचा अभ्यास करणे हे ब्रिटीशांचे वेड. हे वेड त्यांनी जपले ते कसे याबद्दलचा सगळा उहापोह ‘मेमरीज ऑफ अ मॅप ऑफ हिंदुस्थान’ या पुस्तकातून करण्यात आला आहे. अशा अनेक दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शनच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने भरवण्यात येणार आहे. बीएनएचएस हॉर्नबील हाऊस येथे 3 ते 6 जानेवारीदरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 7 यावेळेत मुंबईकरांना हे प्रदर्शन पाहाता येणार आहे.