टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. परंतु टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सुरुवातीचे दोन सामने खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. रोहित शर्माने बीसीसीआयला यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे बीसीसीआय समोर आता मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा व्यक्तिगत कारणांमुळे बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 च्या सुरुवातीच्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यात आहे. रोहित शर्माने तशी माहिती बीसीसीआयला दिली आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे त्याने सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. परंतु शक्य झाल्यास रोहित सर्व पाच कसोटी सामने खेळू शकतो. टीम इंडिया 22 नोव्हेंबर पासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत पर्थमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच दुसरा सामना 6 ते 10 डिसेंबर अॅडलेड (दिवस-रात्र), चौथा सामना 26 ते 30 डिसेंबर मेलबर्नमध्ये आणि पाचवा सामना 3 ते 7 जानेवारी सिडनीमध्ये खेळवला जाणार आहे.