बोरिवलीकरांची तारेवरची कसरत थांबणार;मेट्रो, बोरिवली स्थानक ते ओंकारेश्वर मंदिर स्कायवॉक होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेट्रो-7, बोरिवली स्थानक ते ओंकारेश्वर मंदिरापर्यंत स्कायवॉक होणार असून त्यामुळे या स्थानकाकडे जाताना होणारी गैरसोय, अरुंद रस्ता यातून वाट वाढत मेट्रो, बोरिवली स्थानक गाठणाऱया लोकल प्रवाशांची तारेवरची कसरत थांबणार आहे. या कामासाठी सुमारे 91 कोटींचा खर्च येणार असून पुढील तीन वर्षांत हा स्कायवॉक बांधून पूर्ण होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

कोरोनाचा नियंत्रणात येत असताना पालिका विविध किकासप्रकल्प तसेच रहिवाशांना सुविधा पुरवणारे पायाभूत प्रकल्पही राबवत आहे. बोरिवली पूर्व मध्ये स्थानक ते मार्केट असा स्कायवॉक होणार होता. मात्र, स्थानिकांच्या विरोधानंतर यात बदल करण्यात आला असून बोरिवली स्थानक,  बोरिवली आगार, मेट्रो तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडणारा स्कायवॉक बांधण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासी पर्यटक, विद्यार्थी तसेच कार्यालयीन कर्मचाऱयांचा वेळ वाचणार असून रस्ता ओलांडणे अधिक सुरक्षित होणार आहे. हा स्कायवॉक मे. ए. पी. आय. सिव्हीलकॉन प्रा. लि. या कंपनी बांधणार असून त्यासाठी 91 कोटी 31 लाख खर्च अपेक्षित आहे.