डेटिंग अ‍ॅप वापरणे पडले महागात, आता पोलिसांकडे मागतोय मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये लॉकडाऊनदरम्यान एका तरुणाने टाईम पास म्हणून डेटिंग अ‍ॅप डाऊनलोड केले. हे ऍप वापरणे या तरुणाला चांगलाच महागात पडला आहे.

लखनऊमध्ये एका तरुणाने डेटिंग अ‍ॅप डाऊनलोड केले. या अ‍ॅपच्या माध्यमातून तरुणाची एका तरुणीशी ओळख झाली. दोघांनी नंतर आपला फोन नंबरही एक्सचेंज केला. नंतर तरुणीने अश्लील फोटो पाठवण्यास सुरूवात केली. त्यानंतर तरुणानेही स्वतःचे नग्न फोटो पाठवले. दोघे तासनतास गप्पा मारायचे. फोनवर समोरून तरुणीचाच आवाज असायचा, परंतु नंतर तो पुरुष निघाला. त्याचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पैश्यांची मागणी केली. तेव्हा तरुण चांगलाच घाबरला. पीडित तरुणाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली आहे. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.