गणपती विसर्जनासाठी गेलेला मुलगा बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपती विसर्जनासाठी कुटुंबियांसह गेलेला 17 वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना सोमवार पेठ परिसरात घडली आहे. पियुष चंद्रकांत थोरात (वय 17) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याची आई मनीषा चंद्रकांत थोरात (वय 45, रा. मंगलमूर्ती रस्ता, रास्ता पेठ) यांनी तक्रार दिली आहे.

गणपती विसर्जनाच्या दिवशी पियुष कुटुंबीयांसह सोमवार पेठेतील शाहू उद्यान परिसरात गेला होता. त्यानंतर तो तेथे नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्याची तब्येत बरी नसल्याने तो घरी गेला असावा, असे त्याच्या कुटुंबीयांना वाटले. पियुष घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा ठावठिकाणा न लागल्याने त्याच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके तपास करत आहेत.