
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला. त्यामुळे तुर्कीविरोधात हिंदुस्थानात संतापाची लाट आहे. तुर्कीविरोधात ‘बॉयकॉट ट्रेंड’ सुरू आहे. याचा फटका तुर्कियेच्या पर्यटनाला बसला असून 750 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजते हिंदुस्थानी नागरिक तुर्की येथे फिरण्यासाठी आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी जातात. मात्र आता इटली, थायलंड, दुबई आणि मॉरिशसला पसंती दिली जात आहे. पर्यटक तुर्की आणि अझरबैजान या देशांमध्ये फिरायला जाण्याचे बुकिंग रद्द करत आहेत. दोन्ही देशांच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे. अनेक मोठ्या बुकिंग ट्रव्हल कंपन्यादेखील यात सामील झाल्या आहेत.