Breaking – ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरीचा पती अभिनेता आशुतोषची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी अभिनेता आशुतोष भाकरे याने आत्महत्या केली आहे. नांदेड मधील राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याने मराठी इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. आशुतोष याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आशुतोष हा ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आहे.

अभिनेता आशुतोष याने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’, या चित्रपटात अभिनय केलेला आहे. अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्यासोबत 21 जानेवारी 2016 ला तो विवाह बंधनात अडकला होता.