
चांदी चमकली; किंमत लाखाच्या जवळ
सोने आणि चांदीच्या किमती दिवसेंदिवस वाढत असून सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किमती झपाटय़ाने वाढल्या आहेत. बुधवारी सराफा बाजारात चांदीने किमतीत उच्चांक गाठला आहे. चांदी 94 हजार 280 रुपये प्रतिकिलोवर म्हणजेच लाखाच्या घरात पोहोचली आहे, तर सोन्याच्या किमतीतही वाढ झाली असून सोने आता 10 ग्रॅमसाठी 72,625 रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईत 22 पॅरेट सोन्याची किंमत 67,100 रुपये झाली आहे. येत्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बॉयफ्रेंडने ब्रेकअप होताच खर्च मागितला
सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच ब्रेकअपची चर्चा रंगलेय. बॉयफ्रेंड व्यवसायाने सीए आहे. त्यामुळे सात महिन्यांत प्रेयसीवर केलेल्या खर्चाचा सगळा हिशेब त्याने मांडलाय. अगदी पॅबपासून कॉफीपर्यंत… पै-पैची वसुली त्याला करायची आहे. तशी एक्सेल शीट तयार करून त्याने प्रेयसीला पाठवली आहे. बॉयफ्रेंडने प्रत्येक महिन्याच्या खर्चाची यादी केलेय. टॅक्सी, सिनेमा, कॉफी, सिगारेट- खानपानसारख्या खर्चाचा समावेश आहे. या सगळ्यावर 18 टक्के जीएसटी लावला असून एकूण 60 हजार 635 रुपयांचे बिल प्रेयसीला पाठवले आहे.
एचडीएफसीचा 25 जूनपासून नवा नियम
एचडीएफसी बँकेने आपल्या एसएमएसच्या सुविधेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता यूपीआयच्या माध्यमातून 100 रुपयांपेक्षा कमी ट्रान्झिशन्स केल्यास त्याचा कोणताही एसएमएस अलर्ट ग्राहकांना मिळणार नाही. त्यामुळे आता 100 रुपयांपेक्षा कमी ट्रान्झिशन्स केल्यास बँकेच्या खातेदारांना स्वतःहून खात्यात किती पैसे शिल्लक आहेत, ते तपासावे लागणार आहे. 500 रुपयांपेक्षा कमी रुपये खात्यात व्रेडिट झाल्यास त्याचाही मेसेज मिळणार नाही. एचडीएफसी बँकेने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 25 जूनपासून केली जाणार आहे.
10 जूनपासून अॅपलचा इव्हेंट
अॅपलने आपला वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फ्रेन्स (डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2024) इव्हेंटची घोषणा केली. हा इव्हेंट 10 जूनपासून सुरू होणार असून 14 जूनपर्यंत चालणार आहे. अॅपल पंपनी या इव्हेंटमध्ये आयपह्न, आयपॅड,
अॅपल वॉच, अॅपल टीव्ही, होमपॉड, एअरपॉड्स, अॅपल व्हिजन प्रो आणि मॅकसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम लाँचिंग करण्याची शक्यता आहे. पंपनी आर्टिफिशियल इंटेलिजेन्ससंबंधी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. 10 जून रोजी रात्री 10.30 वाजता या इव्हेंटची सुरुवात होईल. हा इव्हेंट अॅपलच्या यूटय़ूब चॅनेल आणि वेबसाईटवर लाइव्ह पाहता येईल.
10 फूट लांबीच्या मगरीमुळे लोकांची पळापळ
उत्तर प्रदेशातील बुलंद शहरात आज एका मगरीने खळबळ उडवून दिली. नरौरा गंगाघाट येथून जाणाऱया कालव्याजवळ 10 फूट लांब मगर दिसली. त्यामुळे लोक घाबरून पळू लागले. लोकांची गर्दी बघून मगर घाबरली आणि रॅलिंगवर चढून गंगा नदीच्या दिशेने जाऊ लागली. मगरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बाथरूममध्ये आढळले पस्तीसहून अधिक साप
आसाममधील नागाव जिह्यातील एका घरात पस्तीसहून अधिक साप आढळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱयांना धक्का बसला आहे. आसाममधील नागाव जिह्यातील कालियाबोर भागात एका घरात सुमारे 35 जिवंत साप आढळल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्राणीप्रेमी संजीब डेका यांनी हे साप पकडले. त्यानंतर जोसागर दलानी परिसरात सापांना सोडण्यात आले.



























































