नवीकोरी चारचाकी शेणाने सारवली व नवविवाहितेची केली पाठवणी, कारण ऐकाल तर थक्क व्हाल

3818

प्रत्येक वडिलांचे स्वप्न असते की आपल्या मुलीचे लग्न धुमधडाक्यात, वाजतगाजत व्हावे. मुलीच्या लग्नामध्ये कोणतीही कसर बाकी राहू नये म्हणून वडील पाण्यासारखा खर्चही करतात. अनेकदा मुलीच्या इच्छेखातर हेलिकॉप्टरद्वारेही वरात आणली जाते. मात्र तुम्ही कधी नवविवाहीत मुलीची शेणाने सारवलेल्या गाडीतून पाठवणी केल्याचे पाहिले आहे का? छ्या… लग्नात असे कोण करते.. असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. मराठवाड्यातील एका डॉक्टरने आपली एलयूव्ही चारचाकी शेणाने सारवली आणि लाडक्या मुलीची पाठवणी केली.

doctor-marriage

नवनाथ दुधाळ असे या मुलीच्या वडिलांचे नाव असून ते व्यवसायाने डॉक्टर आणि शास्त्रज्ञ आहेत. मुंबईतील टाटा रिसर्च रुग्णालयामध्ये त्यांनी अनेक वर्षे कामही केले आहे. रुग्णालयातून निवृत्त झाल्यानंतर डॉ. दुधाळ यांनी समाजसेवक राजीव दीक्षित यांच्या प्रेरणेने धाराशिव येथे गुरुकुल गोशाला सुरु केली आणि गायीच्या शेणावर रिसर्च करू लागले. याच दरम्यान गायीच्या शेणाद्वारे बाह्यतापमान कमी करता येऊ शकते असा शोध त्यांनी लावला. याचमुळे त्यांनी आपल्या एसयूव्ही गाडीला शेणाने सारवले.

doctor-marriage1

गाडी सारवण्य़ासाठी तब्बल 30 किलो शेणाचा वापर करण्यात आला. गाडी शेणाने सारवल्यानंतर गाडीतील तापमान कमी होऊ लागले आणि एसीचा वापरही कमी होऊ लागल्याचे डॉ. दुधाळ यांनी सांगितले. गाडी शेणाने सारवल्यानंतर 6 महिने तिला धुण्याचीही आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे प्रतिदिन 20 लिटर पाण्याची बचत होत असल्याचे ते म्हणाले. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या