
संपूर्ण महाराष्ट्रात अन्न भेसळीविरोधात धडक कारवायांमुळे चर्चेत आलेल्या एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंना एका लहानग्याने एक साकडे घातले आहे. महिलांची मशेरी बंद करण्याची मागणी करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो म्हणतो महिला तोंडामध्ये मशेरी भरतात आणि गावभर लोकांची मापं काढतात. हा व्हिडीओ @namdev.patil.5015 या इन्स्टा आयडीवरून शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओवर आतापर्यंत 4 हजारांहून अधिक प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. कोणी म्हणतंय, ‘मुंढे साहेब, या मुलाच्या तक्रारीकडे तातडीनं लक्ष द्या.’ तर कोणी म्हणतंय, ‘उगी तक्रार करू नकोस. गावातील बायका लाटणं घेऊन तुझ्या मागे लागतील.’ व्हिडीओमधील मुलाची निरागसता आणि हावभाव आपले लक्ष वेधतात.

























































