साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 09 ऑगस्ट 2026 ते शनिवार 15 ऑगस्ट 2026

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलिमा प्रधान

मेष – चौफेर सावध रहा
चंद्र मंगळ युती. तुमच्या क्षेत्रात काम करताना चौफेर सावध रहा. वाद, तणाव वाढवू नका. नात्यातील गैरसमज दूर करा. प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संवाद राखा.
शुभ दि. 9, 10

वृषभ- महत्त्वाचा निर्णय घ्याल
चंद्र, बुध युती. प्रत्येक दिवस प्रेरणादायी ठरेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटेल. तुमच्या क्षेत्रात आघाडी राहील. नोकरीत उत्कर्ष होईल. कर्जाचे काम करा. आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घ्याल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे प्रभावी ठरतील.
शुभ दि.9,15

मिथुन- वेळेचा योग्य वापर करा
बुध, नेपच्यून त्रिकोणयोग. कार्याला योग्य दिशा मिळेल. स्पर्धेत अव्वल राहाल. वेळेचा योग्य वापर करा. नोकरीधंद्यात प्रशंसा होईल. कठीण प्रश्न रेंगाळत ठेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना पूर्ण करा.
शुभ दि. 13, 14

कर्क- वेग नियंत्रणात ठेवा
बुध प्लुटो युती. रागावर ताबा ठेवा. मोठे यश संपादन करता येईल. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावा. नोकरीत प्रगतीची संधी लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचे कौतुक होईल. शुभ दि. 14, 15

सिंह – निर्णय घेताना सावध रहा
शुक्र हर्षल त्रिकोणयोग. कोणताही निर्णय घेताना सावध रहा. क्षुल्लक कारण वादासाठी महत्त्वाचे ठरू शकते. मोठा निर्णय चुकेल. नोकरीधंदा सांभाळा. कायद्याचे पालन करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. थट्टामस्करी टाळा.
शुभ दि. 9, 14

कन्या- कुणालाही कमी लेखू नका
शुक्र नेपच्यून प्रतियुती. सप्ताहाच्या सुरुवातीला कठीण कामे करा. क्षुल्लक अडचणींवर मात कराल. कुणालाही कमी लेखू नका. नोकरीधंद्यात वाढ होईल. गुंतवणुकीत घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज टाळा. प्रतिष्ठा वाढेल. शुभ दि. 9, 15

तूळ- खर्चावर नियंत्रण ठेवा
चंद्र, बुध युती. क्षुल्लक वाद वाढवू नका. गैरसमज, नाराजी होऊ देऊ नका. नोकरीधंद्यात वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नविन परिचयावर विश्वास ठेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या गुणवत्तेचे, योजनांचे कौतुक होईल. शुभ दि. 9, 13

वृश्चिक- रागावर ताबा ठेवा
चंद्र, बुध युती. सप्ताहाच्या सुरूवातीला संतापजनक घटना घडेल. रागावर व वाहनावर ताबा ठेवा. चांगल्या कार्यावर भर द्या. कठीण प्रश्न मार्गी लागतील. नोकरीधंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गती मिळेल. शुभ दि. 14, 15

धनु- अहंकार दूर ठेवा
शुक्र, प्लुटो त्रिकोणयोग. आत्मविश्वास, उत्साह नियंत्रणात ठेवा. गैरसमज, तणाव वाढेल. कायदा मोडेल असे कृत्य नको. नोकरीत दगदग होईल. अहंकाराची भाषा वापरू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर सावध रहा.
शुभ दि. 9, 15

मकर- गैरसमज होतील
चंद्र, गुरू युती. तुमची चूक नसताना टिका, आरोप होतील. कुणालाही कमी लेखू नका. योग्य संधी मिळणे या सप्ताहात कठीण आहे. चौकस बुद्धी वापरा. नोकरीधंद्यात क्षुल्लक गैरसमज होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ रहा. शुभ दि. 11, 15

कुंभ- गैरसमज टाळा
चंद्र, मंगळ युती. क्षेत्र कोणतेही असो नम्रता ठेवा. सावध रहा. वाद, गैरसमज टाळा. मनावर दडपण येईल. जवळच्या व्यक्ती दुरावण्याची शक्यता. कुणालाही कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या.
शुभ दि. 9, 13

मीन- प्रवासात सावध रहा
शुक्र, नेपच्यून युती. अहंकार आवरा म्हणजे मोठे यश संपादन करता येईल. गोड बोलून कामे करा. नोकरीधंद्यात जम बसेल. वसुली करा. प्रवासात मात्र सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. उत्साह वाढेल. शुभ दि. 11, 15