
तुमच्याकडे भाडे दिल्याची पावती नसल्यास तुम्ही आयटीआर दाखल करताना HRA, म्हणजे घरभाडे भत्त्याचा दावा करू शकणार नाही.
घरमालकाशी वादात तुमची बाजू सिद्ध करण्यात अडचणी येऊ शकतात. भाडेकरूंना त्यांच्या हक्कांसाठी Model Tenancy Act 2021 जाणून घेतला पाहिजे.
घरमालकाने भाडय़ाची पावती देण्यास नकार दिला तर काळजी करण्याची गरज नाही. जो भाडेकरू वेळेवर भाडे देतो, त्याला विनाकारण डिफॉल्टर मानले जाणार नाही.
भाडय़ाच्या पावतीमध्ये भाडय़ाची रक्कम, महिन्याचे नाव आणि पैसे भरल्याची तारीख लिहिलेली असते. तुम्ही स्वतः भाडे पावती करून त्यावर घरमालकाची सही घेऊ शकता.
भविष्यात भाडय़ासंदर्भात कोणताही वाद झाला, HRA दावा करायचा असेल किंवा भाडे वेळेवर भरल्यास सिद्ध करायचे असल्यास भाडय़ाची पावती अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज ठरू शकतो.






























































