
भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाबाहेर (ISS) पहिला ‘स्पेसवॉक’ यशस्वीपणे पूर्ण केला. जेसिका मीर यांच्यासोबत त्यांनी तब्बल ६ तास २७ मिनिटे अंतराळात राहून स्थानकाच्या सौर ऊर्जा प्रणालीच्या देखभालीचे काम केले. या मोहिमेत मेनन यांनी ‘स्टारबोर्ड ६’ ट्रसवरील ३ पॉवर चॅनेलसाठी मॉडिफिकेशन किट बसवले. भविष्यातील सौर ऊर्जा अॅरे बसवण्यासाठी हे काम महत्त्वाचे ठरणार आहे. मेनन यांचा हा पहिला, तर मीर यांचा सहावा स्पेसवॉक होता.
























































