
संत म्हणजे साक्षात चालतेबोलते परमेश्वर! समाजाला निर्भिडपणे उत्तर देण्याची, समाजाशी सामना करण्याची हिंमत केवळ संतांमध्ये असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरातच्या संत लोयण. आपल्या सौंदर्याला शाप समजणाऱ्या आणि दिवसरात्र परमेश्वराचे चिंतन करणाऱ्या संत लोयण यांनी आपले सगळे अभंग दुष्ट राजा लाखा याच्यावर लिहिले आणि माणूस चुकीचा वागला तर परमेश्वर त्याला कधीच माफ करत नाही, याची अनेक उदाहरणे त्यांनी सांगितली. तुम्ही जर नामस्मरणाच्या छायेत असाल, तर कोणतेही वार्अट कर्म, वाईट शस्त्र, नजर, विचार तुम्हाला शिवणार नाहीत. कृष्णाला आपलं सर्वस्व मानणाऱया, अप्रतिम सौंदर्य लाभलेल्या संत लोयण कायम नामस्मरण करीत असत. आपल्या अमोघ वाणीने परमेश्वराचे महत्त्व सांगणाऱया संत लोयण यांची कृष्णभक्ती भक्तीगाथेतील नितांत सुंदर उदाहरण आहे.



























































