
लग्न म्हटलं की लगीनघाई आलीच. याच घाई-गडबडीत नवरी मेहंदी डिझाईनच विसरली अन् तिने थेट ‘चॅट जीपीटी’ला साकडे घातले. कंटेंट स्ट्रटेजिस्ट अनुषा जैन मेहंदीचे डिझाईन फायनल करायलाच विसरली. अखेर तिने आपली लव्हस्टोरी ऐकवत ChatGPT आणि AI च्या मदतीने मेहंदी रंगवली. मेहंदीमध्ये मुंबई आणि जयपूरशी संबंधित काही आठवणी, एक खास शब्दकोडे, लग्नाच्या ठिकाणाचा नकाशा काढण्यात आला आहे. अनुषाने चॅट जीपीटी आणि एआयने सुचविलेले डिझाईन मेहंदी आर्टिस्टला दाखवत तसेच डिझाईन हातावर काढून द्यायला सांगितले. सोशल मीडियावर तिने ही संपूर्ण कहाणी आणि मेहंदीचे पह्टो शेअर केले आहेत. @kaafimoody या इंस्टा अकाउंटवर हा व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. या व्हिडीओला chatgptindia नेही कमेंट केली आहे.






























































