
दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. आम आदमी पार्टीचे आमदार कुलदीप कुमार आणि भाजप आमदार रवी नेगी यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्यानंतर हे दोन्ही आमदार एकमेकांना चांगलेच भिडले. आप आणि भाजपचे आमदार एकमेकांवर धावून गेले. एकमेकांना धक्काबुक्की केल्याने विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी यावर नाराजी व्यक्त करत या आमदारांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली विधानसभेच्या तीन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. हे अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.




























































