
अयोध्येच्या राममंदिरातील लुटमार हा राष्ट्रीय अस्मितेला लागलेला कलंक आहे. त्यावर चर्चा व्हावी ही विरोधी खासदारांची मागणी सत्ताधाऱ्यांनी फेटाळली. त्यांनी मंदिर चोरीच्या मुद्द्यावर संसद चालू दिली नाही. राममंदिर चोरीवर चर्चा नाकारणे हाच मोठा रामद्रोह आहे. भाजप व त्याच्या परिवाराने तो केला. 105 वेळा अयोध्येतील राममंदिर लुटले. गझनीच्या महमूदनेही इतक्या वेळा हिंदूंची मंदिरे लुटली नव्हती. हिंदुत्वाचे टिळे लावून जे सत्तेवर आले त्यांनी अयोध्येत मरण पावलेल्या कारसेवकांचे रक्त विकले. दुसरे काय बोलायचे?
राममंदिर लुटीचा विषय विरोधकांनी लावून धरला. शिवसेनेने तर ‘रामरक्षा’ आंदोलनाने भक्तांना जागरूक केले. तेव्हा विरोधक हिंदुत्वाला बदनाम करत असल्याचा शंख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने फुंकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर त्याही पुढे जाऊन म्हणाले, ‘‘विरोधक खोटे बोलत आहेत. राममंदिरात चोरी झालेली नाही. जो नाही रामाचा तो काय कामाचा?’’ वगैरे बतावण्या करून चोरीवर या मंडळीनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सगळे राम दरबारातील भंपक लोक उघडे पडले आहेत. राममंदिरातील ‘दान’चोरीच्या प्रकरणाच्या तपासाबाबत ‘एसआयटी’ने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सविस्तर माहिती सादर केली. त्यात राममंदिरात 105 वेळा दानचोरी झाल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टातील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही माहिती सादर केल्याने ‘चोरीचा आरोप हा हिंदुत्व विरोधकांचा कट आहे’ असे सांगणाऱ्यांच्या थोबाडीत बसली आहे. 105 वेळा दानपेटी लुटली व हे लुटारू भाजप गोटातले हिंदुत्ववादी आहेत. त्यांच्यावर अयोध्येतील राममंदिराच्या दानपेटी रक्षणाची जबाबदारी होती, पण हिंदुत्वाचे चौकीदारच चोर निघाले आहेत. या प्रकरणात दहापेक्षा जास्त लोकांना अटक झाली. चोरीचा मुद्देमाल जप्त केला, पंचनामा झाला तरीही वकिलीची पदवी धारण करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे लोक
दणकून खोटे
बोलतात की, ‘‘चोरी झाली नाही. विरोधक राममंदिरास बदनाम करत आहेत.’’ श्रीमान फडणवीस, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. विरोधकांनी या चोरीचा भंडाफोड केला नसता व त्यावर संसद दणाणून सोडली नसती तर ही चोरीची मालिका सुरूच राहिली असती. एवढेच नव्हे तर आता जी 105 वेळा चोरी झाली ती एक लाख वेळा झाली असती. एक दिवस रामाच्या सातबारावरून अयोध्या गायब करून भाजप गोटातील एखाद्या उद्योगपतीला ती विकली असती. अयोध्येतील राममंदिर ट्रस्टने मोठ्या प्रमाणात जमिनींचाही घोटाळा केला व त्यातले लाभार्थी ‘भाडखाऊ’ हे भाजप परिवारातले आहेत. मंदिर परिसरातील जमिनी ओरबाडून स्वस्तात घेतल्या. पुढच्या चोवीस तासांत त्याच जमिनी मंदिर ट्रस्टला कोट्यवधींना विकल्या. ही ‘इस्टेट’गिरी रामाच्या नावाने झाली. त्यात बड्या बड्यांचे हात अडकले आहेत. हिंदुत्वाच्या नावाने झालेला हा सौदा म्हणजे बेशरमपणाच आहे. राममंदिर उभारणीसाठी शेकडो कारसेवकांनी, साधुसंतांनी रक्त सांडले, बलिदान दिले. बाबरी कोसळत असताना भाजपचे लोक पळून गेले होते त्यांनी कारसेवकांना वाऱ्यावर सोडले होते. आज तेच लोक राम मंदिराच्या तिजोरीच्या चाव्या धोतराला अडकवून फिरत आहेत. त्यांनीच मंदिर लुटले, पैसे चोरले, राम व सीतेची आभूषणे चोरली, देणग्यांच्या हिशेबात हेराफेरी केली. राममंदिराच्या बाबतीत ही दरोडेखोरी बिनधास्त सुरू असेल तर देशाच्या
सार्वजनिक संपत्तीची
काय अवस्था असेल? ज्यांनी राममंदिराची दानपेटी सोडली नाही, ते देशाच्या सार्वजनिक संपत्तीची कशी लूट करत आहेत ते रोजच दिसत आहे. अयोध्या हे आता धार्मिक, आध्यात्मिक केंद्र राहिले नसून ते ‘व्यापारी’ केंद्र बनवले गेले आहे. सिनेकलाकार, भाजपचे भजन करणाऱ्या व्यापारी लोकांना शरयूच्या किनारी भूखंड दिले आहेत. त्याच शरयू नदीत गोळीबारात जखमी झालेल्या कारसेवकांना जिवंत फेकण्यात आले होते. त्यांच्या रक्ताने शरयू लाल झाली होती. आज भाजप हे सर्व विसरला आहे. अयोध्या व तेथील राममंदिर म्हणजे त्यांच्यासाठी ‘आर्थिक उलाढालीचे केंद्र’ झाले आहे. त्यामुळे राम मंदिरातील चोरीची वेदना त्यांच्या काळजात घुसली नाही व चोरीचा जाब विचारणाऱ्यांना ‘रामद्रोही’ ठरविण्याचा निर्लज्ज प्रयत्न झाला. अयोध्येच्या राममंदिरातील लुटमार हा राष्ट्रीय अस्मितेला लागलेला कलंक आहे. त्यावर चर्चा व्हावी ही विरोधी खासदारांची मागणी सत्ताधाऱयांनी फेटाळली. त्यांनी मंदिर चोरीच्या मुद्द्यावर संसद चालू दिली नाही. राममंदिर चोरीवर चर्चा नाकारणे हाच मोठा रामद्रोह आहे. भाजप व त्याच्या परिवाराने तो केला. 105 वेळा अयोध्येतील राममंदिर लुटले. गझनीच्या महमूदनेही इतक्या वेळा हिंदूंची मंदिरे लुटली नव्हती. हिंदुत्वाचे टिळे लावून जे सत्तेवर आले त्यांनी अयोध्येत मरण पावलेल्या कारसेवकांचे रक्त विकले. दुसरे काय बोलायचे?































































