
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असताना, मलकापूर येथे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी निवेदन देण्यास गेलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांनाही दोरखंड लावून रोखण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांना दोरखंड लावून मुख्यमंत्र्यांपासून दूर ठेवण्यात आले. निवेदन स्वीकारण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. ‘शेतकरी तुमचा शत्रू नाही, तो राज्याचा अन्नदाता आहे. त्याच्या हातातील निवेदनापासून सरकार एवढे अंतर का ठेवत आहे?’ असा सवाल त्यांनी केला.
हा आहे मुख्यमंत्र्यांचा VIP दुष्काळ पाहणी पर्यटन दौरा..
वावरातच टेबल टाकून त्यावर करपलेले सोयाबीन ठेवून पाहणीचा सोपस्कार..@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AUThackeray @ShivsenaUBTComm #दुष्काळ #शेतकरी #सोयाबीन #शेतकऱ्यांना_न्याय #VIPदौरा #FarmerCrisis #Drought #Farmers pic.twitter.com/byLivXApeV
— Kailas Patil (@PatilKailasB) September 23, 2026
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रत्यक्ष ऐकून घेणे अपेक्षित होते. मात्र, पाहणीचा सोपस्कार उरकून मुख्यमंत्री निघून गेले, असा आरोपही आमदार पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केला आहे.




























































