
आपल्या घरातील तुपाचे भांडे, तेलाची बुधली किंवा किटली या भांडय़ांच्या खाली त्याच्या आकाराच्या ताटल्या ठेवाव्यात. न वापरलेले प्लॅस्टिकचे डबे किंवा त्यांचे झाकण ठेवावे. असे केल्याने तेलाचे डाग ओटय़ावर पडत नाहीत.
स्वयंपाक झाल्यावर लगेच ओटा ओल्या व कोरडय़ा कापडाने पुसून घ्या. गरम भांडी थेट ग्रॅनाईट किंवा मार्बलवर ठेवू नका. यासाठी मॅट किंवा स्टँड वापरा. तेलकट आणि चिकट डागांवर बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचे मिश्रण लावा.






























































