
निवासस्थानी भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून उद्धट वागणूक मिळत आहे, असा गंभीर आरोप करत अभिजीत दिपके यांनी एका पीएसआयला जाब विचारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मला कोणाला भेटायचे हे पोलीस ठरवणार नाहीत, तो निर्णय मी घेईन, असे दीपके यांनी पोलिसाला ठणकावून सांगितले.
सोशल मीडियावर अभिजीत दीपके यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते एका पीएसआयला थेट घराबाहेर हाकलून लावताना दिसत आहेत. आपल्याला भेटण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना पोलीस अत्यंत उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप दीपके यांनी केला आहे.
अमेरिकेतील एका एआय स्टार्टअपने ‘फ्युचर क्राईम समिट 2026’मध्ये आपल्या एआय टूलमध्ये स्वतःची माहिती वापरल्याचा आरोप करत अभिजीत दीपके यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. माझी माहिती वापरण्याची परवानगी कोणी दिली, असा सवाल त्यांनी सोशल मीडियावर केला.
सीजेपीच्या बैठकीत देशभरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मोहीम राबवण्याचा, शिक्षण शुल्काच्या प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा व 12 सदस्यीय कार्यकारिणी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.





























































