
स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत. तीन किंवा सहा महिन्यांचेच करावेत. त्यामुळे मसाल्यांचा स्वाद कमी होत नाही आणि पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो.
स्वयंपाकघरातील मसाल्यांचा स्वाद आणि सुवास टिकवून ठेवण्यासाठी ते नेहमी एअरटाईट (छिद्रे नसलेल्या) काचेच्या डब्यात ठेवावेत. हे डबे थेट सूर्यप्रकाश आणि दमटपणापासून दूर अंधाऱया, कोरडय़ा जागी साठवावेत. मसाल्यांच्या डब्यात ओले किंवा जुने चमचे घालू नयेत, जेणेकरून मसाले वर्षभर ताजे व सुवासिक राहतील.
























































