
रामबन जिह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर एका काळ्या स्काॅर्पिओमधून जात असलेले तीन दहशतवादी पोलिसांना पाहताच स्काॅर्पिओ सोडून जंगलात पळून गेले. या तिन्ही दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली असून एका दहशतवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
जेके 02 एके-1743 नोंदणी असलेली एक काळ्या रंगाची स्काॅर्पिओ श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने चालली होती. चंदेरकोट सुरक्षा तपास पथक गाडीजवळ येताच पोलीस कर्मचाऱयांनी गाडीला थांबवण्याचा इशारा केला, परंतु चालकाने गाडी थांबवण्याऐवजी सुस्साट पळवली. यामुळे डय़ुटीवर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱयांनी तत्काळ पोलीस स्टेशनला याची माहिती पुरवली. तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱयाने गाडीच्या दिशेने गोळीबार केला, परंतु गाडीतील दहशतवादी गाडी सोडून जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, शोध मोहिमेदरम्यान उधमपूर जिह्यातील अल्ताफ मोहमद नावाच्या एका आरोपीला पकडण्यात पोलिसाला यश आले आहे.


























































