आसाममध्ये पुरामुळे मृत्यूंची संख्या 98

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममधील पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 98 वर पोहोचली आहे. 13 जिह्यांमधील 464 गावांमधील जवळपास 1.55 लाख लोक या पुरामुळे बाधित झाले आहेत. गोलाघाट हा जिल्हा सर्वाधिक बाधित झाला असून तेथे सुमारे 58,750 लोक प्रभावित झाले आहेत. प्रशासनाने 55 मदत छावण्या उभारल्या आहेत.