
बंगळुरूमधील लक्झरी हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा विभागाच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. बंगळुरूतील थ्री-स्टार आणि फाईव्ह-स्टार हॉटेल्सची तपासणी करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची 30 पथके तैनात करण्यात आली होती. तपासणीदरम्यान प्रयोगशाळेतील चाचणीसाठी चिकन, मटण, मासे, खाद्य तेल, दूध, मसाले, चहा पावडर, चीज, टोमॅटो सॉस आणि लिंबाचा रस यांसह 35 नमुने गोळा केले.
























































