
ब्राझीलमधील रिओ दि जानेरोमध्ये शनिवारी हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातात पायलटसह तीन कोलंबियन पर्यटकांचा मृत्यू झाला. तिजुका नॅशनल पार्कमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले. अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. यात पायलटसह तीन पर्यटक महिलांचा जळून मृत्यू झाला.
एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा 15वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाच कुटुंबातील सहा जणांचा गट ब्राझीलच्या रिओ दि जानेरोमध्ये आला होता. हेलिकॉप्टरमध्ये केवळ तीनच प्रवासी बसू शकत असल्याने सहा जणांचा गट विभागला गेला, असे रिओ दि जानेरोमधील कोलंबियाच्या महावाणिज्यदूत डायना पाएझ यांनी सांगितले. वाढदिवस साजरा करणाऱ्या मुलीची आजी, मावशी आणि चुलत बहीण यांचा अपघातात मृत्यू झाला.




























































