
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली. खासगी व्होल्वो बस आणि आयशर ट्रकची टक्कर झाली. टक्कर झाल्यानंतर बस आणि ट्रक पुलावरून खाली कोसळले. या अपघातात अंदाजे 40 प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना उपचारासाठी पामिडी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी प्रवाशांना पुढील उपचारांसाठी अनंतपूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

























































