आईची हत्या करून मुलाने स्वतःचे जीवन संपवले, नांदेडमधील धक्कदायक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेडमधील तरोडा खुर्द परिसरातील राहुल कॉलनीत शनिवारी रात्री काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. पोटच्या मुलानेच आईची हत्या करून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. प्रतीक बालाजी चौथरे आणि भारती बालाजी चौथरे अशी मयत मायलेकांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक हा काही काळापासून मानसिक आजाराशी झुंज देत होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते. प्रतीकचे वडील सीआरपीएफमध्ये तैनात आहेत तर बहीण पुण्यात शिक्षण घेत आहे. नैराश्येतून प्रतीकने शनिवारी रात्री आईची हत्या करत मग स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.